धक्कादायक! पतीची तक्रार दाखल केल्याने, पतिने स्कूटीवरुन जाणाऱ्या पत्नीला दिले पेटवून..

केरळ : पती-पत्नीच्या नात्यात कितीही बेबनाव असला तरीही त्यावर तोडगा निघू शकतो, परंतु याचा विचार केला जात नाही. काहीश्या कारणावरून मारहाण, खून अश्या घटना अनेक ठिकाणी घडत आहे.

अशीच एक धक्कादायक घटना केरळ मधून समोर आली आहे. ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
आरती (वय ३२, रा. पट्टानक्कड ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना केरळच्या अलाप्पुझामध्ये घडली आहे. याप्रकरणी पती श्यामचंद्रन गंभीर भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरती आणि श्याम यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बेबनाव होता. त्यामुळे आरतीने श्यामच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. तिने तक्रार दाखल केल्यामुळे श्याम तिच्यावर नाराज होता. आरती आपल्या स्कूटीवरून ऑफिसला निघाली होती. त्यावेळी तिच्या पतीने, श्यामने रस्त्यात तिची गाडी अडवून तिला थांबवले होते.
आरतीच्या अंगावर त्यानं पेट्रोल टाकले. आणि श्यामने तिची स्कूटी पेटवून दिली होती. गाडीने पेट घेतल्यामुळे आगीच्या ज्वाळांमध्ये आरती अडकली होती. ती मदतीसाठी आरडाओरडा करत होती. आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की, याचदरम्यान श्यामलासुद्धा आगीच्या झळा बसल्या होत्या. ही आग आटोक्यात आणल्यानंतर दोघांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आरतीवर तातडीने उपचार सुरू झाले असता संध्याकाळी तिचा मृत्यू झाला आहे. यात श्याम हा गंभीर भाजला असून तोसुद्धा मृत्यूशी झुंजत आहे. तिथल्याच शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.