मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य , काय म्हणाले फडणवीस..!!


Maratha Reservation : सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जालन्याचे मनोज जरांगे पाटील धडपड करत आसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

मराठा समाज हा आरक्षणासाठी  खूप आक्रमक झाला आहे. जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. याच मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे.

मराठा आरक्षणामुळे राज्याचे राजकीय वातावरण देखील तापल्याचे पाहायला मिळत आहे. काही राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. तर काही नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, यामध्येच आता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे.

मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मकतेने काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शिंदे समितीने दोन अहवाल दिले आहेत. तिसरा अहवालही लवकरच प्राप्त होईल.

त्याचबरोबर ओबीसी समाजावर देखील सरकार अन्याय होऊ देणार नाही. आमचं काम पाहून मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा निर्णय घेऊ नये असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!