खरेदीदारांच्या खिशाला फटका! सोन प्रती तोळा 9430 ने वाढले तर चांदीला 20 हजार रुपयांची चकाकी….

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात कमी जास्त प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच आता मागच्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास साडे नऊ हजारांनी वाढले आहेत. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे. फेब्रुवारी महिन्यात 10 तोळा सोन्याचे दर जवळपास 81,000 रुपयांनी वाढले आहेत.

मागच्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 9430 रुपयांनी वाढले आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 8550 रुपयांनी वाढले आहेत. आज मुंबईत सोन्याचे दर जवळपास 1,68,610 रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर आठवड्याभरात खूप तेजीत वाढले आहेत. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 168710 रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे. 22 कॅरेटचे दर 154630रुपये प्रति तोळा आहे.

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर 168860 रुपये झाले आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 1 तोळ्यामागे 154800 रुपये झाले आहेत.
पुणे आणि बंगळुरुमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 168710 रुपये झाले आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 1 तोळ्यामागे 154630 रुपये झाले आहेत.
दरम्यान चांदीचे दर आठवड्याभरात 20000रुपयांनी वाढले आहेत. आज चांदीचे दर 295000 रुपये आहेत.पुढच्या आठवड्यात सोन्याचे दर खूप वाढण्याची शक्यता आहे. इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.