सरकारी मदत घेऊन निम्म्या किमतीत खरेदी करा ट्रॅक्टर, शेतकरी बांधवांनो जाणून घ्या संपूर्ण योजना..
मुंबई : सरकार आता शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना राबवत आहेत. तुम्ही आता प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळवू शकता. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
या योजनेसाठी काही अटी आहेत. यामध्ये त्यापूर्वी हे लक्षात ठेवा की जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही यापूर्वी कोणत्याही कृषी अनुदान योजनेत सहभाग घेतला नसावा.
तुम्हाला कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन अर्ज करता येतो. योजनेअंतर्गत अर्ज हे जनसेवा केंद्रात स्वीकारण्यात येत आहेत. यासाठी तुमच्याकडून काही प्रमाणात शुल्क आकारले जात आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्जाची पोच पावती देण्यात येते.
तुम्ही त्याद्वारे तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 आणि कमाल 60 वर्ष असणे गरजेचे आहे. वार्षिक उत्पन्न एक लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे महत्त्वाचे आहे. अर्जदाराने अर्ज केल्याच्या पहिल्या सात वर्षापर्यंत कोणत्याही सरकारी योजनेचा, केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
तसेच एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळतो. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड तसेच पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचे आहे. जमिनीची कायदेशीर कागदपत्रे असावीत. अर्जदाराकडे बँकेचे स्टेटमेंट आणि बँक पासबुक असावे.
अर्जदारदाराकडे श्रेणी प्रमाणपत्र असावे. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो असावा. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जाते. उर्वरित 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावी लागते.