Bus : आता ११७० रुपयांत फिरा संपूर्ण महाराष्ट्र, एसटी महामंडळाने केली खास सोय, जाणून घ्या…


Bus : तुम्ही सध्या राज्यात किंवा राज्याबाहेर कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या एसटी बसच्या एका खास पासविषयी माहिती समोर आली आहे. यामुळे तुमचा फायदा होईल.

तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेअंतर्गत प्रवाशांना राज्यभर कमी पैसे देऊन फिरता येते. यामध्ये 7 दिवस आणि 4 दिवसांच्या कालावधीसाठी पास दिला जातो. यात साध्या आणि शिवशाही या दोन्ही प्रकारच्या बसमधून तुम्ही प्रवास करू शकता.

यामध्ये शिवशाही शिवशाही बससाठी पासचे दर वेगळे आहेत. यामध्ये मुलांना आणि प्रौढांसाठीच्या पासच्या किमती वेगवेगळ्या आहेत. तुम्ही चार दिवसांची पास घेतल्यास प्रौढांसाठी तुम्हाला 1170 रुपये द्यावे लागतील.

तसेच यामध्ये लहान मुलांसाठी 585 रुपये द्यावे लागतील. हीच 4 दिवसांची शिवशाहीची पास घेतल्यास प्रौढांसाठी 1520 आणि लहान मुलांसाठी 765 रुपये द्यावे लागतील, असे दर यामध्ये आहेत. तुम्ही सात दिवसांची पास घेतल्यास प्रौढांसाठी तुम्हाला 2040 रुपये द्यावे लागतील, तर लहान मुलांसाठी 1025 रुपये तिकीट असेल. Bus

लहान मुलांच्या पासाचे दर हे 5 वर्षापेक्षा जास्त आणि 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत. पाच वर्षांच्या आतील मुलांना एसटी बस प्रवासात कोणतेही तिकिट लागत नाही. तर 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फूल तिकिट काढावे लागेल, असा नियम आहे.

यासाठी तुम्ही तुम्ही एसटी आगर येथील काउंटरला भेट देऊ शकता. ऑफलाइन फॉर्म पूर्ण करू शकता. पाससाठी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!