मोठी बातमी! बस तलावात पडून मोठा अपघात, १७ जण ठार तर ३५ जखमी…


नवी दिल्ली : बांगलादेशातील झलकाठी सदर उपजिल्हामधील छत्रकांडा भागात शनिवारी बस तलावात पडल्याने तीन मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ३५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, हा अपघात बांगलादेशमध्ये झाला आहे. पिरोजपूर येथील भंडारिया येथून सकाळी ९ वाजता चाललेली प्रवाशांची बस बारिशाल-खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे सकाळी १० च्या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली.

त्यामुळे तीन मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले आहेत. ५२ लोकांची क्षमता असणाऱ्या या बसमध्ये ६० पेक्षा जास्त लोक होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांनी धाव घेतली.

दरम्यान, तातडीने बचावकार्य सुरु केले. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!