दिवसाढवळ्या दौंड येथे घरफोडी! पावणेदोन लाखांचे दागिने केले लंपास…

दौंड : दौंड तालुक्यातील शिवराज नगरमध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपयांची घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी दीपक शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी काही कामानिमित्ताने बाहेर गेले होते. तेव्हा बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.

दरम्यान, यापूर्वी शिवराज नगरमध्ये दरोडे, घरफोड्या झालेल्या आहेत. या परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता पोलिस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक जीवराज पवार यांनी केली आहे
Views:
[jp_post_view]
