पिंपरी-चिंचवडमध्ये इंद्रायणीच्या प्रवाहातील 36 बंगल्यावर बुलडोझर, कोट्यवधींचे अलिशान बंगले जमीनदोस्त..


पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकायदा बंगल्यांवर महानगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यांना आधी याबाबत माहिती दिली असल्याचे सांगितले जात आहे. बेकादेशीर बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यावर रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज फेटाळला आहे.

याबाबत हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत बांधकामे पाडून नदीचे मूळ क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. आज या बंगल्यांच्या तोडकामाला महानगरपालिकेने सुरुवात केली. या तोडकामामुळे चिखली परिसरात उद्ध्वस्त झालेले बंगले दिसत आहेत. पहाटे पासून बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेने हाती घेतली आहे.

सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जात आहेत. सकाळी 8 पर्यंत 25 टक्के काम ही पूर्ण झालं आहे. उर्वरित 75 टक्के काम आजचं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.चिखलीतील सर्व्हे नंबर 90 मध्ये बंगलो प्लॉट बांधकाम प्रकल्प करण्यात आला होता.

या बंगल्यावर कारवाईचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, मनोज जरे नामक विकासकाने आम्हाला हा प्लॉट रहिवाशी असल्याचं दाखवलं, त्यापुढे याचा दस्त कसा काय झाला? बांधकाम होत असताना पालिका अधिकाऱ्यांनी परवानगी देण्याच्या नावाखाली पैसे घेतले, असे आरोप करत आहेत.

हे प्लॉटिंग मे. जरे वर्ल्ड आणि इतरांचं आहे. महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या पूररेषेच्या प्रतिबंधित क्षेत्रात ही बांधकामे करण्यात येत होती. दरम्यान, या बांधकामामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आणून पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा कायद्यांचे उल्लंघन केले जात होते. संबंधित विकासकांनी पर्यावरण अधिनियमातील तरतुदींचं उल्लंघन झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!