Buldhana News : दर्शनासाठी तुफान गर्दी अन् भक्तांची रांग, खामगावात प्रकटले गजानन महाराज? चर्चा सुरू
Buldhana News बुलढाणा : शीर्षक वाचून गजानन महाराजांचे भक्त गोंधळून जाणे वा त्यांच्या भावना दुखावल्या जाणे स्वाभाविक आहे. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात एक वेगळाच प्रकार घडला आहे. Buldhana News
सुटाळ पुरा या गावात राहत असणाऱ्या अशोक सातव यांच्या घरात कथित गजानन महाराज अचानक ‘प्रगटले’! परंतु हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
साक्षात गजानन महाराजच गावात प्रकटले, अशी बातमी संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर हुबेहूब गजानन महाराजांसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीला पाहण्यासाठी बघ्यांची आणि भक्तांनी तुफान गर्दी केली. सातव यांच्या घराभोवती यात्रेचा स्वरूप प्राप्त झाले.
आसपासच्या गावातही ही बातमी पसरल्याने नागरिकांनी मिळेल ती गाडी पकडून या व्यक्तीला पाहण्यासाठी आले. जास्त गर्दी झाल्याने शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले.काही वेळानंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवता आलं.
दरम्यान, परंतु हा व्यक्ती कोण? कुठून आली? याबाबात कोणतीही माहिती मिळाली नाही. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशा घटनांविरोधात कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून जोर धरू लागली आहे.