अर्थसंकल्प सोप्या भाषेत! दहा मोठ्या घोषणा, सर्व सामान्यांना होणार फायदाच फायदा…!
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामुळे याचा फायदा होणार आहे. यामध्ये काय स्वस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यामध्ये मोबाईल फोनच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बॅटरीजवरील कस्टम ड्युटी २.५ टक्क्यांनी कमी होणार आहे.
कृषीपुरक स्टार्टअपसाठी मदत करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच पीएम मत्स्य संपदा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ६ हजार कोटी निधीची तरदूत करण्यात आली आहे.
रेल्वेला २.४ लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे सुपरफास्ट होणार असून रेल्वेत ७५००० नवी भरती करण्यात येणार आहे. परदेशात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३० कौशल्य भारत केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना थेट मदत देण्यात येणार आहेत.
तसेच मोफत अन्नधान्य वाटप पुढील वर्षभर सुरू राहणार आहे. तसेच कृषीपुरक स्टार्टअपसाठी मदत करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. पीएम मत्स्य संपदा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ६ हजार कोटी निधीची तरदूत करण्यात आली आहे.
यामध्ये निर्मला सीतारामन यांनी मोबाईल, इलेक्ट्रीक कार, कॅमेरा, लेन्स, खेळणी स्वस्त होणार असल्याचे यावेळी सांगितले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.