Budget 2024 : अर्थसंकल्पात महिलांना मिळाली मोठी भेट, जाणून घ्या महत्वाच्या घोषणा..


Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भारताला २०४७ पर्यंत विकसित देश कसा बनणार? याची माहिती दिली आहे.

अर्थमंत्र्यांचा हा सहावा अर्थसंकल्प असून मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा आणि अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात आज अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

शेतकरी, महिला, तरुण आणि गरिबांना डोळ्यासमोर ठेवून २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या अर्थसंकल्प सादर करताना  तारमण यांनी  यामध्ये महिला आणि मुलींचा विशेष उल्लेख केला आहे. Budget 2024

आयुष्मान योजनेचा लाभ आशा भगिनींना मिळणार…

येत्या ५ वर्षात विकासाची नवी व्याख्या तयार करण्यात येणार असून आशा भगिनींनाही आयुष्मान योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडीच्या कार्यक्रमांना गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सर्व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनाही आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट केले जाईल.

लखपती दीदी योजनेला चालना मिळेल…

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे. लखपती दीदींना बढती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने वेतन २ कोटींवरून ३ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. लखपती दीदींमुळे सुमारे ९ कोटी महिलांच्या जीवनात बदल झाला असून स्वावलंबन आले आहे.

महिलांसाठी अर्थसंकल्पात या घोषणा..

उच्च शिक्षणात महिलांचा समावेश 10 वर्षांत 28 टक्क्यांनी वाढला आहे.
एसटीईएम अभ्यासक्रमांमध्ये मुली व महिलांचा सहभाग 43 टक्के आहे
तिहेरी तलाक प्रथा बंद केली
महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार
पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरं महिलांना
सर्व क्षेत्रांमध्ये नॅनो DAP चा वापर वाढविला जाईल
अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करणार.
‘आशा’ कर्मचाऱ्यांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळणार.
गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीकरण वाढणार.
नॅनो डीएपीचा वापर सर्वच क्षेत्रात वाढणार.
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन योजना आणणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!