BSNL कडून आता मिळणार प्रत्येक घरात मोफत वायफाय, असा करा ऑनलाइन अर्ज…


BSNL : बीएसएनएल तुमच्या घरात मोफत वायफाय कनेक्शन देणार आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून वेळोवेळी यूजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. अशी एक ऑफर आता बीएसएनएल कडून देखील दिली जात आहे. या सरकारी कंपनीने नवीन युजर्सना आकर्षित करण्यासाठी एक नवीन ऑफर सुरू केली आहे.

बीएसएनएल आता नवीन वापरकर्त्यांना वायफाय कनेक्शन मोफत बसवून देणार आहे. म्हणजेच आता तुम्ही बीएसएनएलचे नवे ब्रॉडबँड कनेक्शन घेतले तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही इन्स्टॉलेशन शुल्क द्यावे लागणार नाही. ब्रॉडबँडचे इन्स्टॉलेशन पूर्णपणे मोफत करून दिले जाणार आहे.

बीएसएनएलच्या दोन ब्रॉडबँड सेवा…

भारतफायबर आणि एअरफायबर सेवा BSNL द्वारे ऑफर केल्या जात आहेत. विशेष म्हणजे कंपनीकडून दोन्ही सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जात आहेत. तुम्हालाही नवीन कनेक्शन घ्यायचे असेल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत साइटवर जावे लागेल.

येथे तुम्हाला नवीन कनेक्शन ऑफर केले जाईल. यासाठी लॉगिन करणे आवश्यक आहे. येथे तुम्हाला घराची संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा लागेल. यानंतर तुम्ही राहता त्या ठिकाणी कंपनीची सेवा उपलब्ध असेल तर तुम्हाला मोफत वायफाय कनेक्शन बसवून दिले जाईल.  BSNL

बीएसएनएल ऑफरची मुदत वाढवली…

बीएसएनएलने ही ऑफर गेल्या वर्षीच दिली होती आणि ती ३१ मार्च २०२४ पर्यंत संपणार होती. परंतु आता कंपनीने पुन्हा एक मोठा निर्णय घेतला असून ही ऑफर वर्षभरासाठी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता या वर्षी देखील तुम्ही बीएसएनएलचे ब्रॉडबँड कनेक्शन घेतल्यास तुम्हाला मोफत इन्स्टॉलेशन सेवा मिळणार आहे.

तुम्ही नवीन सेटअप इन्स्टॉल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फक्त प्लानचे पैसे द्यावे लागतील. याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही. म्हणजेच तुम्हाला केबल्स आणि उपकरणांसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. हे कंपनीकडून प्रदान केले जात आहे आणि ते देखील पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!