Brother Sister Marriage : काय सांगता! आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, चक्क बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ…

Brother Sister Marriage : आजकाल प्रेम नेमकं काय असतं आणि ते कोणावर करायचं आणि कोणावर नाही याचा प्रश्नच पडतो. समाजात काही नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि लग्न होऊ शकतं नाही शास्त्रानुसार रक्ताच्या नात्यात लग्न होतं नाही, कारण रक्ताच्या नात्यामुळे पुढील पिढीत जनुकीय दोष निर्माण होण्याची भीती असते.

मात्र एका विचित्र घटनेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका बहीण भावाने लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकन जोडपे डेटिंग करत होते. ते प्रेमात पडले आणि काही काळानंतर त्यांना कळलं ते बहीण भाऊ आहेत.
ही लव्हस्टोरी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ती तरुणी म्हणाली आम्ही जरी नात्याने बहीण भाऊ असो तरी त्यांना काही फरक पडत नाही कारण ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. Brother Sister Marriage

हे प्रकरण अमेरिकेतील उटाहमधील आहे. २० वर्षीय टिकटोकर केन्ना हिने व्हिडीओ शेअर करत आपली प्रेम कहाणी सांगितली आहे. ती म्हणाली की तिने तिच्या चुलत भावाशी लग्न केलं आहे.
ती म्हणाली की, ६ महिन्यांच्या डेटिंगनंतर तिला डीएनए चाचणीतून कळलं की दोघेही चुलत भावंड आहेत. indy100 च्या रिपोर्टनुसार, या अहवालानंतरही त्यांच्या प्रेमात बदल झाला नाही तर त्यांनी एक वर्षानंतर लग्न केले.
तरूणीची लव्ह स्टोरी ऐकून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या जोडप्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांना बहीण भावाचं हे लग्न मान्य नाही. हे नातं बेकायदेशीर असून भविष्यात अशी नाती जेनेटिक्स बिघवणार अशी भीती नेटकऱ्यांनी उपस्थित केली आहे.