प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंच्या निधनानंतर पुण्यात बंधू हृदयनाथ मंगेशकर करणार घोषणा..

पुणे : भारतीय संगीत क्षेत्राचा एक सुवर्णकाळ संपला असून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं.
शेवटच्या श्वासापर्यंत आशा भोसले या गात होत्या आणि सर्वांना पुन्हा पुन्हा त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पाडत होत्या. त्यांच्या निधनानंतर आता बंधू हृदयनाथ मंगेशकर मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आशा भोसले यांचा जन्म प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्य कलाकार पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर होते ते स्वतः गायक होते. त्यांच्या आईचे नाव शेवंती होते, त्या गृहिणी होत्या. आशा ताई पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांच्या मोठ्या बहिणी लता मंगेशकर आणि मीना खडीकर होत्या. तर धाकटे भाऊ-बहिण उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर आहेत. हे सर्व संगीत आणि कला क्षेत्रातील प्रतिष्ठित नावे आहेत. यामुळे संगीत विश्वात मंगेशकर परिवाराचे नाव सोन्याच्या अक्षरात लिहिले जाते.
आशा भोसले गेल्या 7 दशकांहून अथक काळ आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही चिरतरूण गायिका.त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांनी 12 एप्रिलला अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि रिसर्च सेंटर मध्ये आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकरांनी तातडीने पत्रकार बोलवली आहे. या परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
