ब्रिटिश तरुणीवर दिल्लीत बलात्कार, त्याच्यासाठी भारतात आली अन् घडलं भयंकर, घटनेने उडाली खळबळ…


दिल्ली : ब्रिटिश महिलेवर दिल्लीमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियावर मैत्री झालेल्या एका तरुणाला भेटण्यासाठी ही ब्रिटिश तरुणी भारतात आली होती. मा

दिल्लीत त्याला भेटल्यानंतर आरोपीनं तरुणीवर बलात्कार केला. दिल्लीच्या महिपालपूर भागात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित ब्रिटिश तरुणीची इन्स्टाग्रामवर आरोपीशी ओळख झाली होती.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीला इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याचा छंद आहे. त्याचसंदर्भात पीडित तरुणीची आरोपीशी ओळख झाली. ब्रिटिश तरुणी भारतात महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर आली असता या तरुणाला भेटण्यासाठी तिने फोन केला.

पण आपण महाराष्ट्रात येऊ शकत नसल्याचं सांगून आरोपीने तरुणीला दिल्लीत येण्याची विनंती केली. आरोपीशी इन्स्टाग्रामवर चांगली मैत्री झाल्यामुळे तरुणी त्याच्या विनंतीवरून दिल्लीत त्याला भेटण्यासाठी तयार झाली.

दरम्यान, पीडित तरुणी दिल्लीत आल्यानंतर महिपालपूर भागातील एका हॉटेलमध्ये तिने रूम बुक केली. आरोपीला तिथे भेटण्यासाठी बोलावलं. आरोपी त्याचा मित्र वासिमला घेऊन तरुणीला भेटण्यासाठी आला. हॉटेलमध्ये त्या तिघांनी मद्यप्राशनही केलं. यानंतर तरुणीला सोडण्याच्या बहाण्याने आरोपी तिच्या रुममध्ये गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला.

या प्रकारानंतर तरुणीनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्या मित्राला बोलावलं. यानंतर मित्राने देखील तरुणीचा विनयभंग केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!