भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत दाखल ! पेनल्टी शूटमध्ये ब्रिटनचा केला पराभव ….


Hockey : भारतीय ऑलिंपिक संघाने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

रविवारी झालेल्या उपांत्यपूर्व फरीच्या समन्यात भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि गोलरक्षक श्रीजेश यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताने या समन्यात ब्रिटनला पराभूत करून गेल्या ऑलिंपिक मधील पराभवाची परतफेड केली. भारताच्या अमित रोहिदास याला पहिल्या हाफ मध्येच ‘रेड कार्ड’ मिळाल्यामुळे भारतीय संघाला १० खेळाडूंसहच खेळावे लागले. तरीही भारतीय संघाने या दबवाच धिराने सामना करीत सामन्यावर वर्चस्व गाजवले.

खेळाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक हॉकी खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ पेनलटी कॉर्नर मिळाला मात्र कोणीही गोल करू शकले नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने ब्रिटनच्या गोळपोस्टवर आक्रमण करीत आणखी पेनलटी कॉर्नर मिळविले. मात्र त्यांना गोल नोंदविण्यात यश येत नव्हते. शेवटी २२ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने गोल नोंदवीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

 

भारताने आघाडी घेतल्यानंतर ब्रिटनने आपले आक्रमण अधिक तीव्र केले आणि भारतीय गोलपोस्टवर आक्रमण करीत पेनलटी कॉर्नर मिळविला. मात्र श्रीजेशने अप्रतिम गोलरक्षण करीत ब्रिटनचा हा हल्ला परतवून लावला. मात्र २७ व्या मिनिटाला लगेचच गोल नोंदवीत १-१ अशी बरोबरी साधली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी पुन्हा एकमेकांच्या गोलपोस्टवर आक्रमक धडका मारण्याचा सपाटा लावला. ब्रिटनने तिन पेनल्टी कॉर्नर मिळवलेही मात्र भारतीय गोलरक्षक श्रीजेशने अप्रतिम गोल रक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवीत ब्रिटनचे सगळे हल्ले परतवून लावले. या दरम्यान भारतीय संघानेही आक्रमक खेळ केला मात्र त्यांनाही गोल करण्यात यश मिळाले नाही.

 

हाफ टाईमच्या वेळेस दोन्ही संघ १-१ अशी बरोबरी साधून होते. डूर्य हाफ मध्येही आक्रमक हॉकी पहायला मिळाली मात्र दोन्ही संघ गोल नोंदवू शकले नाहीत. दरम्यान भारत आणि ब्रिटनच्या एका एका खेळाडूला ग्रीन कार्ड मिळाल्याने त्यांना समन्यात काही काळ बाहेर बसावे लागले. भारतीय गोल रक्षक श्रीजेशचा त्यात महत्त्वपूर्ण सहभाग राहील. त्याने ब्रिटनचे अनेक हल्ले आपल्या बचावाने फॉल ठरविले.

निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ आशा बरोबरीत राहिल्याने सामना टायब्रेकरमध्ये गेला. शूट आउट मधला पहिलं गोल ब्रिटनच्या जेम्स अलबेरी याने मारला तर भारताकडून हरमनप्रीतने गोल करून बरोबरी साधली. झॅच वॉलेसणे इंग्लंडचा दुसरा गोल नोंदविला; तर भारताकडून सुखजितने. तिसरा स्ट्रोक घेणाऱ्या ब्रिटनचा कॉनॉर विल्यमसन्सचा फटका चुकलं आणि भारताला मोठी संधी मिळाली. भारताच्या ललीतने मग तिसरा फटका अचूक मारत भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.

 

फिलिप रॉपरने मारलेला चौथा फटका श्रीजेशने आडवला आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर स्टिक होती राज कुमार पाल याच्या हातात. त्याने चौथा फटका अचूक मारला आणि भारतीय संघाला उपांत्य फेरीची दारे खुली करून दिली. भारताने हा सामना १-१ (४-२) असा जिंकला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!