उरुळी कांचन येथील महादेव कांचन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी..


उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथील बी. फार्म द्वितीय वर्षाचे विद्यार्थी ओम ढमढेरे आणि सचिन दोरगे यांनी राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल फेस्टिव्हल “टेक मंथन” मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे स्पर्धा जे एस पी एम हडपसर येथे २८ व २९ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते.

या टेक मंथन मध्ये एकूण २० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील मॉडेल मेकिंग स्पर्धेत सचिन दोरगे आणि ओम ढमढेरे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम पारितोषिक मिळवले, तसेच विवाद स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांनी तसेच ॲड मॅड कॉम्पिटिशन मध्ये १५ व मॉडेल मेकिंग स्पर्धेत १० असे एकूण ३६ डी. फार्म व बी. फार्म च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या उल्लेखनीय यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन एम. गवई व प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कांचन साहेब, सचिव डॉ. अजिंक्य कांचन, कार्यकारी संचालक डॉ. अप्पासाहेब एम. जगदाळे, प्राचार्य डॉ. नितीन एम. गवई, HOD बी फार्म कुणाल हाके, HOD डी फार्म सोनाली कोतवाल तसेच संपूर्ण अध्यापन वर्गाने विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या सर्व स्तरांतून विद्यार्थी व शिक्षक वर्गाचे कौतुक होत आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!