मोठी बातमी! महादेव जानकर देणार भाजपला दे धक्का, थेट दिल्लीतून केली मोठी घोषणा….


नवी दिल्ली : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले, आम्ही सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. मी सध्या नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहे. नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादव या तिघांकडूनही मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

राहुल गांधी यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी आमचं आदरातिथ्य उत्तमरित्या केले. जबाबदार आणि मोठा नेता असून गांधी यांनी मला जो रिस्पेक्ट दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच शरद पवार हे देशातील प्रमुख नेते आहेत, ते आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत.

अखिलेश यादव हे तर माझे मित्रच आहेत. हे तीन नेते अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला येत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि तेजस्वी यादव यांना निमंत्रण दिलेले आहे. असेही जानकर म्हणाले. यामुळे जानकर इंडिया आघाडीत येणार असल्याचे सांगितले जात आहे.

तसे झाल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे. जानकर हे एक बडे नेते असून त्यांनी अनेक निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपने त्यांना बाजूला केलं आहे. यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!