मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण ; मंत्री नरहरी झिरवळानीं’ त्या ‘चर्चा फेटाळल्या….

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावरून मंत्री झिरवळ यांच्यावर आरोप होत होते. यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.या प्रकरणी हेतुपुरस्सर कोणी त्रास देत नसल्याचे सांगत, चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच त्यांना उपमुख्यमंत्र्याकडून समज देण्यात आल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळल्या आहेत.

अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तो लिपिक झिरवाळ यांच्या कार्यालयात कामाला होता.त्यामुळे त्यांचेही नाव जोडले गेले.या प्रकरणानंतर नरहरी झिरवळ काही काळ नॉट रिचेबल होते. त्यामुळे चर्चांना अधिक उधाण आले. प्रकरणाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी घेतली आहे.
तसेच नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना चांगली समज दिली असल्याच्या चर्चा देखील होत होत्या. ताईंनी (सुनैत्रा पवार) त्यांना समज दिल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळल्या. त्या दिवशी ताईंनी समज दिली नाही किंवा तशी चर्चाही नव्हती, असे त्यांनी नमूद केले आहे. उलट ताईंना दादांच्या जागी घेतले पाहिजे, अशी एकच चर्चा होती, असे ते म्हणाले. दादांच्या जाण्याने मोठा फटका बसल्याचेही त्यांनी मान्य केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या विभागातील क्लार्क लाच प्रकरणात सापडला, ही माझीही जबाबदारी आहे. या कृत्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जर या धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा देईन. असे त्यांनी याआधी स्पष्ट केल आहे.