Bribe : थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांच्यासह दोघेजण ‘एसीबी’च्या जाळ्यात, ७ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले..

Bribe उरुळी कांचन : थेऊरच्या भ्रष्ट व लाचखोर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांना व त्यांच्या खाजगी दोन इसमांना ७ हजारांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. हवेली महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकसेविका जयश्री कवडे व त्यांचे खाजगी इसम योगेश कांताराम तातळे (वय २२, खाजगी संगणक ऑपरेटर रा. चौधरी पार्क, बाबु कदम चाळ, दिघी)व विजय सुदाम नाईकनवरे (वय ३८ वर्ष, व्यवसाय एजंट, रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता, थेऊर मंडल अधिकारी कार्यालयामध्ये खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांनी तक्रारदार यांच्याकडून फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी लोकसेविका जयश्री कवडे यांच्यासाठी तडजोडीअंती ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. व खाजगी इसम विजय नाईकनवरे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. Bribe

तर लोकसेविका जयश्री कवडे यांनी खाजगी नाईकनवरे याच्या लाच मागणीस व लाच रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले. म्हणुन खाजगी इसम तातले व नाईकनवरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जयश्री कवडे व त्यांचे दोन खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.