Bribe : पोलीस दलात खळबळ! १ लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Bribe रायगड : फसवणुकीच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर संपत खंडागळे यांना एक लाखाची लाच स्वीकारताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. Bribe
तर पोलिस उपनिरीक्षक सुरज जगन्नाथ पाटील यांच्याविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे लाचलुचपत विभागाकडून सांगण्यात आले आहे. Bribe
ही कारवाई गुरूवारी (ता. १२) सायंकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दोघांवर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन पोलीस अधिकाऱ्यांवर एसीबीने कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सावंतवाडी पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी तक्रारदाराविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला उच्च न्यायालयाकडून दोन दिवसांपूर्वीच जामिन मंजूर झाला आहे.
परंतु दुसर्या आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही त्याची अटक टाळण्यासाठी तक्रारदारावर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हे सतत दबाव आणत होते.
याबाबत तक्रारदार यांनी ८ ऑक्टोबर रोजी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून रायगड एसीबीचे पथक पाच दिवसापूर्वीच सावंतवाडीत दाखल झाले होते.
या तक्रारीच्या अनुषंगाने खंडागळे व पाटील यांनी तक्रारदार यांच्याशी केलेला संवाद लाचलुचपत विभागाने रेकॉर्ड केला होता. त्या रेकॉर्ड मध्ये या तपास अधिकाऱ्यांनी दुसर्या आरोपीची अटक टाळण्यासाठी तसेच तपास कामात सहकार्य करण्यासाठी लाख रूपयांची लाच मागितल्याचे रेकॉर्डिंग मध्ये दिसून आले होते.
मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी एक लाख रूपयांची लाच सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांना रंगेहाथ पकडले. तर यातील पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हे शासकीय दौऱ्यात असल्याने त्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही.