ब्रेकिंग! जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर, ठरला एप्रिलचा मुहूर्त ? दोन गोष्टींचा अडसर

पुणे:राज्यात 29 महानगरपालिकेंच्या निवडणुकासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकां होणार असल्या तरी त्याचा मुहूर्त मात्र लागलेला नाही. आता या निवडणुका पुन्हा लाबंणीवर पडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात या निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

येत्या फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर बारावी व त्यानंतर दहावीच्या परीक्षांची धावपळ सुरू होणार आहे. त्यामुळे मार्च अखेरीपर्यंत जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागणे शक्य नसल्याने एप्रिल महिन्यातच या निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकींना आता कधी मुहूर्त लागणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यातील ज्या जिल्हा परिषदमधील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक गेलेली तेथील निवडणुका फेब्रुवारी तर इतर ठिकाणच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होतील.सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगर पंचायती व नगर परिषदांच्या निवडणुका पूर्ण झाल्या, तर महानगरपालिकांच्या निवडणुकाची प्रक्रिया वेळेत संपणार आहे.

या सर्व निवडणुकांसाठी साधारण महिनाभराचा कालावधी दिला जात असल्याने ३१ जानेवारीपूर्वी जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.