ब्रेकिंग! युगेंद्र – तनिष्काचा विवाह सोहळा दिमाखात ; पवार कुटुंबांचा जल्लोष

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकले आहेत. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या हाय-प्रोफाईल विवाह सोहळ्याला राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेतेमंडळींनी हजेरी लावली, विशेषतः पवार कुटुंबातील प्रमुख सदस्य या निमित्ताने एकत्र आले होते.

पवार कुटुंबातील तरुण नेते युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या निमित्ताने शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्ती एकाच वेळी उपस्थित होत्या.खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नाच्या कार्यक्रमात तुफान डान्स केला, ज्यामुळे सोहळ्याची रंगत आणखी वाढली आणि एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.एकीकडे संपूर्ण कुटुंब विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
राजकीय वर्तुळात या दोन्ही गटातील संबंधांवर सातत्याने चर्चा होत असताना, अजित पवारांची ही गैरहजेरी लक्ष वेधणारी ठरली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुतण्या युगेंद्र पवार यांच्या लग्नाला उपस्थित न राहता दौंड मध्ये प्रचाराला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच या ऐतिहासिक वाक्याचा दाखला दिला.माझ्याही घरातच लग्न आहे पण मी प्रचारात आहे असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची आदेश दिले.

