ब्रेकिंग! साताऱ्यात कोरोनाने महिलेचा मृत्यू, महाराष्ट्रात संख्या वाढल्याने चिंता वाढली…

सातारा : येथील जिल्हा रुग्णालयात करोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७० वर्षीय महिलेच्या कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी माहिती दिली आहे. त्यांच्यावर येथील रुग्णालयातील करोना वार्ड मध्ये उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते.

उपचारात असताना आज त्यांचा मृत्यू झाला. या महिला रहिमतपूर येथील होत्या. साताऱ्यात अडीच वर्षानंतर करोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत प्रशासन सतर्क झाले असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात देखील संख्या वाढली आहे.
एक कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर एक महिला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. करोनाग्रस्त झाल्यानंतर अंतिम स्तरावर या महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान, सध्या देशात कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले आहेत आणि आता ही संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांनी सांगितले की, ३० मे पर्यंत देशभरात २७१० रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी एका आठवड्यात ७५२ रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वेगाने वाढत आहे. यामुळे आता आगामी काळात वाढ थांबवण्यासाठी सतर्क राहावे लागणार आहे.