ब्रेकिंग!अजितदादांच्या विमानाचा पायलट सुमित कपूरला ब्लॅकमेल कोणी केलं? पत्रकार परिषदेतून रोहित पवारांचा धक्कादायक उलगडा..


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेतून विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आल होत? अशी शंका उपस्थित केली आहे.त्यांना कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी असल्यामुळे पायलट तणावात होते. त्यावरून त्यांना कोणी ब्लॅकमेल केलाय का, हे ब्लॅकमेल करणारे कोण आहेत, याचा उलगडा होणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, अपघातग्रस्त विमानाचे मुख्य पायलट सुमित कपूर हे एक अत्यंत अनुभवी वैमानिक होते. त्यांनी सुमारे 16000 तास उड्डाण केले आहे. त्यांना कौटुंबिक अडचण होत्या. त्यातून त्यांना ब्लॅकमेल केलंय का, त्यातून ही मुद्दाम घटना घडली का अशी शंका आहे. त्याशिवाय, त्यांना मद्य प्राशनाची सवय होती. त्यांची दोन वेळेस ब्रेथ अॅनेलेसिस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. साधारणतः 3 ते 4 वर्षे निलंबित झाले होते. त्यानंतर कोरोना काळात बेरोजगार होते. त्यानंतर त्यांना व्हीएसआर कंपनीत कमी पगारात नोकरी मिळाली असा उलगडा त्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, पायलट सुमित कपूर हे व्हीएसआर एव्हिएशन मध्ये सामील होण्यापूर्वी सहारा, जेट एअरवेज आणि जेट लाईन यासारख्या प्रमुख विमान कंपन्यासाठी त्यांनी उडान देखील केले आहे.जेटमध्ये असताना त्यांना 10 ते 12 लाख पगार होता. सध्याच्या कंपनीत 3 ते साडेतीन लाखाचे वेतन होतं. त्यात त्यांना 25 हजार प्रत्येक फेरी मागे मिळायचे असे रोहित पवार म्हणाले.

तसेच सुमित कपूर यांना महागड्या मद्याची सवय होती. कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी यामुळे तणावात होते. त्यावरून त्यांना कोणी ब्लॅकमेल केलाय का, हे ब्लॅकमेल करणारे कोण आहेत, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. या सर्व गोष्टींचा पारदर्शक तपास व्हायला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!