भिगवण अपहरण प्रकरणातील ‘त्या ‘मुलीचा व्हिडिओ समोर, दिली प्रेमाची कबुली…


पुणे : पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे एका तरुणीच्या अपहरण प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं असताना या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.सोशल मीडियावर संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पीडित तरुणीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

तरुणीने व्हिडिओत असं म्हटलं आहे की, गेल्या एक वर्षापासून मी प्रेम संबंधात असून स्वतःच्या मर्जीने प्रियकर सोबत निघून गेली आहे.कोणाच्याही दबावाखाली नसून स्वत:च्या मर्जीने या तरुणासोबत जात आहे,” असे तिने म्हटले आहे. या व्हिडिओमुळे हे प्रेम प्रकरण असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत असले, तरी मुलीच्या कुटुंबीयांनी आणि राजकीय नेत्यांनी हे मान्य करण्यास नकार दिला आहे.

काय आहे प्रकरण?

भिगवण परिसरातील एका तरुणीचे भर चौकात अपहरण केलं गेलं. तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली, त्यांना बेदम मारहाण केली आणि मुलीला आरोपी सोबत घेऊन गेले. अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि मुलीचा शोध घेण्याच्या मागणीसाठी स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चामुळे भिगवणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावाचे वातावरण आहे.

दुसरीकडे तरुणीच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिची अपहरण करण्यात आले.तिच्या आईला मारहाण करून तिला गाडीतून उचलून नेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दरम्यान दुसरीकडे त्या तरुणीने स्वतः व्हिडिओ दिलेल्या प्रेमाच्या कबुलीने आणखीन वातावरण चांगलंच तापलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!