ब्रेकिंग! अजित पवारांचं विमान कोसळण्यामागे’ या’ व्यक्तीचा हात; VSR च्या मालकाचा CID समोर धक्कादायक उलगडा…


पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून वारंवार VSR कंपनीकडे बोट ठेवले जात आहे. या प्रकरणाचा तपास सीयआडीकडून केला जात असून, व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही.के. सिंग याचीही चौकशी करण्यात आली. या चौकशीत मालकाने अजित पवारांचा विमान कोसळण्यामागे एका व्यक्तीचा हात असल्याचा धक्कादायक उलगडा केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही के सिंग याचीही चौकशी करण्यात आली. पहिल्या दिवशी एकूण 8 तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं.यानंतर पुढील तीन दिवस व्ही के सिंगची चौकशी झाली. या चौकशीदरम्यानच व्ही. के. सिंगने नोंदवलेल्या जबाबासंदर्भात नवा खुलासा समोर आला आहे.अजित पवार यांच्या विमान अपघातात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक होती, असं व्ही के सिंगने म्हटलं आहे.

सीआयडी कडून त्यांना व्हीएसआर विमान भारतात कधी आणले? कोणाकडून खरेदी केले? याची चौकशी केली आहे. व्हीएसआर कंपनीचे विमान किती तास चाललं? याचीही विचारणा करण्यात आली. व्हीएसआर कंपनीच्या विमानाच्या देखभालीबाबतही प्रश्न विचारण्यात आले.त्यानंतर व्ही. के. सिंगने अजित पवारांच्या अपघाता मागे पायलट सुमित कपूरची चूक असल्याचे स्पष्ट केल आहे.अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, असंही व्ही के सिंगने सीआयडीला सांगितलं आहे.

दरम्यान अपघाताबात व्हीएसआर विमान खरेदीची सीआयडीने सखोल चौकशी केली आहे. विमानातील तांत्रिक बाबी सुरक्षा नियमांचे पालन आणि अपघाताच्या संबंधित मुद्द्याबाबत चौकशी करण्यात आल्याची माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.

तसेच सुमित कपूर त्या दिवशी विमान उडवण्यासाठी मूळ नियोजित पायलट नव्हता. मूळ पायलट साहिल मदान ट्रॅफिकमध्ये अडकल्याने काही तास आधी सुमित कपूरला कॉल आला आणि त्याने अजित पवारांचं विमान बारामतीला घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारली असेही VSR कंपनीच्या मालकाने सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!