ब्रेकिंग! मुंबई महापौर पदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी काढणार सोडत

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुत मिळत सत्ता स्थापन केली आहे.भाजप-शिवसेनेनं बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपचा 89 तर शिवसेनेचा 29 जागांवर विजय झाला आहे.या निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून महापौर पदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.मुंबई महानगरपालिकेचा महापौर नेमका कोण होणार, याचा निर्णय जानेवारी महिना अखेरीस स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून 24 तास होत नाही तोवर महापौर पदाविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या अखेरीस महापौर निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.सत्तास्थापन, संख्याबळाची गणिते आणि संभाव्य आघाड्यांमुळे महापौर निवड प्रक्रियेवर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.


दरम्यान पुढील आठवड्यात नगर विकास खाते महापौरपदासाठी सोडत काढण्याची प्रक्रिया राबवणार आहे. महापालिकेतील आरक्षणाच्या नियमानुसार महापौरपदासाठी सोडत काढली जाते. या सोडतीनंतर महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार, हे स्पष्ट होणार असून त्यानंतरच उमेदवारांची नावे निश्चित होण्यास सुरुवात होणार आहे.राजकीय वर्तुळात विविध नावांची चर्चा सुरू असली, तरी अधिकृत घोषणा होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महापौरपद हे मुंबई महानगरपालिकेतील सर्वोच्च पद मानले जाते. त्यामुळे या पदासाठी राजकीय पक्षांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. मुंबईच्या कारभाराची दिशा, विकासकामे आणि प्रशासकीय निर्णयांवर महापौराची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर पदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
