ब्रेकिंग! अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचं कारण वेगळंच? विमान हवेतच 90 डिग्री फिरलं अन….

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने अख्खा महाराष्ट्र पोरका झाला आहे. त्यांच्या विमाना अपघाताच्या तांत्रिक विश्लेषणातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ असलेल्या गोजुबावी ग्रामपंचायतीत लावलेल्या सीसीटीव्हीत अजित पवारांचं विमान हवेतच 90 अंशात फिरल असल्याच समोर आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाच्या दिशेनं जात असताना हवेत अचानक चक्क ९० अंशात फिरल्यामुळे
कलंडल.या प्रकारानंतर अवघ्या काही सेकंदात हे विमान कोसळलं आणि कोसळल्यानंतर आगीचे लोळ दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे हे विमान मुंबईहून बारामतीला आले होते आणि तिथून पुन्हा ते मुंबईला जाणार होते. त्यामुळे विमानाच्या परतीच्या प्रवासासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती लागणारे 1400लिटर इंधन त्यात शिल्लक होते.

विमान जमिनीवर आदळताच या इंधनामुळे आगीचा भीषण डोंबं उसळला.ज्यामुळे विमानात आगीच्या ज्वालाचा भडका उठला. त्यामुळे विमानातील कोणालाही बाहेर निघण्याची संधी मिळाली नाही.सुरुवातीला धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती, यामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याचं समोर आलं. मात्रत्यानंतर हवेत अचानक त्यांचं विमान चक्क ९० अंशात फिरल्याचं समोर आलं.त्यामुळे या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
तसेच विमान डाव्या बाजूला का कलंडलं? विमानाचं इंजिन फेल झालं का? विमानाचा एकच लँडिंग गिअर उघडला? लँडिंगवेळी इंजिनात तांत्रिक बिघाड? विमान अनियंत्रित का झालं? असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या अपघाताचं कारण फक्त धुकं नव्हतं, तर वेगळंही कारण असू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
