ब्रेकिंग! तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडेच; सुनेत्रा पवारांच्यावर आणखीन एक जबाबदारी, मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल…


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे असलेली जवळपास सर्व खाती सुनेत्रा पवारांना मिळाली होती. केवळ अर्थ खातं सुनेत्रा पवारांना देण्यात आलं नव्हतं. मात्र आता वित्त खाते तीन-चार महिन्यात राष्ट्रवादीकडे परत येण्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त खाते आपल्याकडे ठेवले होते. मात्र नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या एका बैठकीत येत्या तीन ते चार महिन्यांत राज्याचे वित्त आणि नियोजन खाते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडे असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांची राज्याच्या वित्त विभागावर जबरदस्त पकड होती. त्यांनी आतापर्यंत विक्रमी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर हे महत्त्वाचे खाते कोणाकडे द्यावे, याबाबत पेच निर्माण झाला होता. मात्र अलीकडेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. याच बैठकीत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडं देण्याचा निर्णय झाला आहे.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे वित्त खाते वगळता उपमुख्यमंत्री पद आणि उत्पादन शुल्क, क्रिडा व युवकल्याण तसेच औकाफ ही खाती देण्यात आली आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिजोरीच्या चाव्या पुन्हा राष्ट्रवादीकडे देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे अर्थात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!