ब्रेकिंग!अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात तपासाचा वेग वाढला ; VRS कंपनीच्या दिल्ली कार्यालयात पोहचले चौकशी अधिकारी

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. आता अजित पवार यांच्या विमानाचा अपघात प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. यासाठीVRS कंपनीच्या दिल्ली कार्यालयात चौकशी अधिकारी दाखल झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ज्या विमानाचा अपघात झाला ते अपघातग्रस्त विमान Learjet 45 असून विमानाची मालकी VSR Ventures Pvt Ltd कंपनीची आहे.या कंपनीच्या विमानाचा हा गेल्या तीन वर्षातील दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावर विशाखापट्टणम येथून आलेल्या विमानाचं लँडिग दरम्यान अपघात झाला होता.
आता कंपनीच्या दिल्ली कार्यालयात कंपनीचे मालक आणि AIB चे अधिकारी तब्बल दीड तासांहून अधिक काळ आत उपस्थित होते. चौकशी पूर्ण करून AAIB चे अधिकारी कंपनीबाहेर आले असून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेऊन सील करण्यात आली आहेत.या चौकशीसाठी तीनहून अधिक अधिकारी VRS व्हेंचर्स कंपनीत पोहोचले होते. या चौकशीत काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

VRS च्या कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार कंपनीचे मुख्यालय दिल्ली असून मुंबई, भोपाळ, हैदराबाद येथेही कंपनीची कार्यालये आहेत. विजय कुमार सिंह हे कंपनीचे मालक आहे.दरम्यान, VSR Ventures Pvt Ltd ही कंपनी 15 वर्षांपासून हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत असून कंपनीत किमान 60 वैमानिक आहेत. VSR व्हेन्चर्सतर्फे खासगी कंपन्यांमधील बडे अधिकारी, उद्योजक यांना विमान सेवा पुरवली जाते. कंपनीची वेबसाईट दुपारी 12 वाजल्यापासून बंद आहे.
आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला… याची सखोल चौकशी केली जाणार आहे.तर दुसरीकडे विमान अपघातातील ढिगाऱ्यातून अपघाताची कारणे कशा प्रकारे उलगडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे