ब्रेकिंग! रुपाली ठोंबरे पाटलांच्या राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम, पक्षाने सोपवली महत्वाची जबाबदारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील या दोन महिला नेत्यांमधील वाद चांगलाच उफाळून आला होता.या वादानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून उचल बांगडी केल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र आता पक्षाकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत नाराज रुपाली ठोंबरे पाटील यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यांना एका मतदारसंघाचं कार्याध्यक्षपद देण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रूपाली ठोंबरे पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चेदरम्यान अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून त्याच्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार गटाने सर्व विधानसभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि समन्वयक नेमले आहेत. त्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यध्यक्ष पदावर रुपाली पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाने नवी जबाबदारी दिल्याने त्यांची नाराजी दूर होतेय का, हे पाहावे लागणार आहे.

सुनील टिंगरे यांनी पत्रात म्हटलं आहे की, ‘अजित पवार यांनी मला पुणे शहर अध्यक्ष (पूर्व) या पदावर नियुक्ती दिली. तसेच माझ्याकडे वडगावशेरी, हडपसर, शिवाजीनगर व कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र दिलंय”पक्षाध्यक्ष्यांच्या आदेशानुसार माझ्या कार्यक्षेत्रातील पुणे शहर कार्यकारीणी तयार केलेली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांच्या व पुरोगामी विचारांच्या सक्रीय कार्यकर्त्यांचा समावेश केलाय. या कार्यकारीणीचा तपशील देत आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

