ब्रेकिंग!अजित पवारांना सुनील तटकरेंनी संपवलं ; शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपाने नव्या वादाला ठिणगी


पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर विविध महत्त्वाची माहिती समोर येत असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. अजितदादांना सुनील तटकरेंनीच संपवलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे नव्या वादाला ठिणगी पडली आहे

रामदास कदम यांनी पुढे असे म्हटले आहे की,राजकारणात जो माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो, तो काहीही करू शकतो. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?”असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तटकरेनीचं अजित दादांना संपवल आहे.त्यांच्या जाण्यानंतर शरद पवारांना शह देण्यासाठी मोठं राजकारण केलं. दादांच्या चितेची राख देखील शांत झाली नव्हती, तोच तटकरेंनी वहिनींना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार किमान दहा दिवस दुःखाचे पाळावे लागतात, त्यानंतर शपथविधी झाला असता तर काय बिघडलं असते?” असा सवाल त्यांनी केला आहे.

अजित दादांना संपवण्यामागे त्यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.ज्या माउलीचे कुंकू आणि मंगळसूत्र गेले, त्यांना सुतकही पाळू न देता मुंबईला आणून शपथविधी करायला लावणाऱ्या तटकरेंना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!