ब्रेकिंग! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड, NCP आमदारांचा एकमतान ठराव


पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या विधिमंडळ गटनेतेपदी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे. आज दुपारी दोन वाजता विधिमंडळात गटनेते निवडण्यासाठीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रवादी आमदाराच्या सर्वानुमते सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. त्यात विधिमंडळ गटनेतेपद जास्त काळ रिक्त ठेवणे योग्य नव्हते, त्यामुळे पक्षाने तातडीने हालचाली करत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केली. तसेच पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी होणार आहे.

मात्र शपथविधीच्या पूर्वी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. छगन भुजबळ यांनी गटनेतेपदाचा ठराव मांडला तर हसन मुश्रीफ, वळसे पाटील, धनंजय मुंडे यांनी ठरावाला अनुमोदन दिले.या बैठकीत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान सुनेत्रा पवार यांची राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून निवड होणार आहे. संध्याकाळी लोकभावनात साध्या पद्धतीने त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा आणि वाटचाल कशी असणार हे सुनेत्रा पवार यांना ठरवावे लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!