ब्रेकिंग!…..तर उद्याच सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ, राष्ट्रवादीच्या नेत्यांन काय म्हटलं?

पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांसह अख्खा महाराष्ट्र हळहळला आहे. त्यांच्या निधनानंतर पक्षाचं काय होणार? उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.आता अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होण्याची शक्यता असून, तशी तयारी सुरु झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत सूनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. या शपथविधीसाठी कोणतीही जय्यत तयारी केली जाणार नाही, अत्यंत साधेपणाने तो पार पडेल. या शपथविधीनंतर सूनेत्रा पवारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल. यासह राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या वारसांना ती संधी दिली जाणार आहे. राज्यसभेवर असलेल्या सुनेत्रा पवार आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
