ब्रेकिंग! गौरी गर्जेच्यां शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा ; तीन शब्दांनी संशय वाढला….


पुणे : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे- गर्जे यांच्या मृत्यूप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणातील डॉ.गौरी गर्जे यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल असल्याच समोर आल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गौरी पालवे- गर्जे यांनी गळफास लावून घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात डॉ. राजेश ढेरे यांनी गौरी गर्जे यांच्या शवविच्छेदन अहवालातील महत्त्वाचा तपशीलाची माहिती दिली आहे. या प्राथमिक अहवालात ओपिनिअन रिझर्व्हड एव्हिडन्स ऑफ नेगेचर कम्प्रेशन ऑफ नेक असा उल्लेख आहे. याचा अर्थ गौरीचा मृत्यू गळ्यावर दाब पडल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र यातील अंतिम माहिती राखून ठेवण्यात आली आहे. या शवविच्छेदन अहवालावर अनैसर्गिक असा शेरा देण्यात आला आहे. मात्र सध्या तिच्या मृत्यूचे अंतिम कारण राखून ठेवण्यात आले आहे.डॉ. गौरी यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे. डॉ.ढेरे यांच्या प्राथमिक अहवालानंतर आता पोलिसांना या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करावा लागणार आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार, घटनास्थळावरून काही वस्तू पुरावे म्हणून जशाच्या तशा ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक वाटलेल्या गोष्टींचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. लॅबचे रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यू नेमका कोणत्या कारणांनी झाला, याबद्दलची सविस्तर माहिती दिली जाईल आणि अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे,असेही डॉ. ढेरे यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात आता आणखीन काय खुलासा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!