ब्रेकिंग! अजित पवारांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातून धक्कादायक निरीक्षण, नेमकं काय आहे कारण?


पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएने चाैकशीचे आदेश दिले होते. या चाैकशीचा प्राथमिक अहवाल पुढे आला आहे. या अहवालानुसार, वैमानिकाचा अंदाज चुकला असावा किंवा विमानात तांत्रिक बिघाड अशी माहिती समोर येत आहे.

प्राथमिक चौकशीच्या अहवालात असं नमूद करण्यात आल आहे की, अजित पवारांच्या विमानाला झालेला अपघात हा तांत्रिक बिघाडाबरोबर तर मानवी चुकामुळे ही कारणीभूत होता. विमान लँडिंगच्या वेळी पायलटला धावपट्टीच्या अंतराचा आणि स्थितीचा अचूक अंदाज न आल्याने विमानाचा समतोल बिघडला असल्याचा खुलासा या अहवालात करण्यात आला आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चाैकशी करावी अशी मागणी केली जात आहे. सीआयडीचीही स्थापना या प्रकरणात करण्यात आली आहे. विमान अपघातानंतर लगेचच केंद्रिय पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संबंधित तपास केला. अपघातानंतर विमानाचे राहिलेले अवशेष देखील मुंबईला तपासासाठी आणण्यात आली. नेमकी गडबड कुठे झाली, याचा अधिक तपास केला जात आहे.

दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या विमान अपघात प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विमान उतरण्याच्या क्षणी त्यांच्या नियंत्रण प्रणालीमध्ये किंवा इंजिन मध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला असावा असं या चौकशी अहवालात म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!