ब्रेकिंग! राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती ढासळली ; पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल..


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काही दिवसांपूर्वीच पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र आता प्रकृती अस्वस्थतेमुळे पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत पक्षाकडून माहिती देण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आल आहे. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना निरीक्षणाखाली ठेवून सलाईन देण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. सततच्या धावपळीमुळे आणि मानसिक तणावामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचं सांगितले जात आहे.

शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सलाईन देण्यात येणार आहे.अशक्तपणा वगळता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये काळजीच वातावरण निर्माण झाल आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच त्यांना ताप,खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पाच दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. मात्र आता त्यांना अशक्तपणा जाणवू लागला असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!