ब्रेकिंग! महाराष्ट्रातील शाळांना सलग पाच दिवस सुट्टी ; कोण-कोणत्या शहरांचा समावेश?

पुणे : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असताना सरकारकडून शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.या मतदानासाठी अनेक ठिकाणी शाळांमध्येच मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी शाळा भरणार नाहीत. त्यामुळे मुलांना पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध विषयांसाठी सेवेवर घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारी रोजी विशेष सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान शाळेला 14 तारखेला संक्रांतीची सुट्टी आहे. त्यानंतर 15 ला मतदान आणि 16 ला सध्याच्या मागणीनुसार सुट्टी जाहीर झाली तर शिक्षक नसल्याने आणि निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण यंत्रणांना काम संपवण्यासाठी शाळांचा परिसर वापरला जाणार आहे. त्यानंतर 17 तारखेला शनिवार असून 18 तारखेला रविवार आहे. त्यामुळे मुलांना पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच प्रमुख शहरांमध्ये 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 15 जानेवारीला मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी मतदान होणार आहे.
तसेच सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, आणि चंद्रपूरमध्येही याच दिवशी मतदान होणार आहे. त्यामुळेच या 29 ठिकाणी ज्या प्रमाणे मतदानाच्या दिवशी सुट्टी असणार आहे तशी दुसऱ्या दिवशीही दिली जावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे शाळांना आता सलग पाच दिवस सुट्टी असणार आहे.
