ब्रेकिंग!कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा मृत्यू, प्रकरणाला वेगळे वळण?

पुणे : गेल्या दहा वर्षापासून चर्चेत असलेल्या ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याचा आज मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वी समीर गायकवाडचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड हा पानसरे हत्या प्रकरणातील दहा संशयित पैकी अटकेत असलेला पहिला संशयित आरोपी होता. अचानक त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. गायकवाड याचा संबंध सनातन संस्थेचा होता. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे


कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरात गोळीबार झाला होता. या प्रकरणात 10 संशयितापैकी गायकवाड याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला वेगळी वळण लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.,
पानसरे हत्या प्रकरणाचा खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा आणि मुख्य संशयित मानल्या जाणाऱ्या गायकवाडच्या मृत्यूमुळे आता या प्रकरणाच्या कायदेशीर प्रक्रियेत काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
