ब्रेकिंग! पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर….


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातील कथित जमीन व्यवहार प्रकरणात निलंबित करण्यात आलेले पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सुर्यकांत येवलेला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटकपुर्व जामीन मंजुर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

1800 कोटींची जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यानंतर पुण्याचे तहसीलदार सूरर्यकांत येवले यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं होत. अशातच आता निलंबित तहसीलदार सूरर्यकांत येवले यांना न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटकपुर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे. पुण्यातील बोपोडी मधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात हा व्यवहार मंजुर करण्यात आला. मात्र न्यायालयाच्या या आदेशात पार्थ पवारांच्या कंपनीचा सहभाग असलेल्या मुंढवा भागातील जमिन प्रकरणाचा उल्लेख नाही. मुंढवा प्रकरणात देखील येवलेवर आरोप आहे आणि गुन्हा दाखल आहे. जामीनासाठी अर्ज करताना येवलेने तो निर्दोष असल्याचा दावा केला होता. या सर्व प्रकरणानंतर आता तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर हा अटकपुर्व जामीन देण्यात आला आहे.

दरम्यान या बोपोडी जमीन प्रकरणात जे इतर आरोपी आहेत, ज्यामध्ये अमेडिया’ कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांना देखील अशाच पद्धतीने अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांना खरंच या प्रकरणात कारवाई करायची आहे का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!