ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी राज ठाकरें भेटीला ; कोणत्या विषयावर चर्चा?

मुंबई:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या’ नंदनवन’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची ही पहिलीच भेट आहे.त्यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. ही भेट ‘सदिच्छा भेट’ असल्याचे सांगण्यात येत असले तरी, चर्चेचा मुख्य विषय आगामी राजकीय समीकरणे असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बदलेले पक्षीय बल आणि भविष्यातील रणनीती यावर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या भेटीदरम्यान केवळ राजकीयच नव्हे, तर मुंबईतील विकासकामे, नागरी समस्या आणि इतर सामाजिक विषयांवरही या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली.

दरम्यान महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधल्याने महायुती आणि मनसे यांच्यातील जवळीक अधिक वाढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.