ब्रेकिंग ! या दोन जिल्ह्यात पडणार मेघगर्जनेसह पाऊस ,हवामान प्रशासनाचा मोठा अंदाज …

Havaman Andaj : सध्या उन्हाळा ऋतू सुरु आहे मात्र उन्हाळ्यात देखील वातावरण बदलले असून महाराष्ट्रातील अनेक भागात मागच्या काही दिवसापासून पाऊस पडताना दिसत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये 21 मे पर्यंत जोरदार वारे, वादळ आणि हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपर्यंत दोन्ही जिल्ह्यांत ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
सोमवार आणि मंगळवार (20-21 मे) दोन्ही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील हवामानाबाबतही विभागाने ताजी माहिती दिली आहे. राज्यात मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
सोमवारी मुंबईत आलेल्या वादळामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला. काही दिवसांनी पुण्यात वादळ आले आणि तिथेही होर्डिंग्ज पडल्याची बातमी आली. त्यामुळे नागिरकांना काळजी घेण्याचे आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.