ब्रेकिंग! दिल्ली स्फोटाचं पुलवामा कनेक्शन? स्फोटात वापरलेली कार किती जणांना विकली गेली ; धक्कादायक माहिती समोर…

दिल्ली : राजधानी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शक्तीशाली कार बॉम्बस्फोट झाला. याप्रकरणी तपास यंत्रणेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.स्फोट घडवण्याच्या पद्धतीपासून ते कारच्या मालकी पर्यंतचा एक वेगळा पॅटर्न समोर आला आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचेच संकेत मिळत आहेत. या हल्ल्याचं पुलवामा कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती I 20 कार 2014 पासून तब्बल चार जणांना विकण्यात आली होती. सगळ्यात आधी सलमान नावाच्या व्यक्तीने 18 मार्च 2014 रोजी ही कार विकत घेतली होती. त्यानंतर ती देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकण्यात आली. पुढे ही कार सोनूकडे गेली. अखेरीस तारिक यांच्यापर्यंत पोहोचली.या कार खरेदी विक्रीच्या व्यवहारात फरीदाबादमधील एका कार डिलरचाही सहभाग असल्याचं उघड झाले आहे.दिल्लीत झालेल्या या बॉम्बस्फोटाचा सर्व अंगांनी तपास होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) हा तपास आपल्या हाती घेऊ शकते. दिल्ली पोलिसांनी रात्री उशिरा या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. स्फोटासाठी वापरलेल्या’HR 26 7674′ i20 कारची मालकी गुरुगावमध्ये राहणाऱ्या सलमानकडे आढळून आली. मार्च महिन्यात देवेंद्र नावाच्या माणसाला कार विकल्याच त्याने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती काढण्यासाठी आरटीओशी संपर्क साधला. प्राथमिक तपासातून ही माहिती समोर आली आहे. बनावट आयडी वापरण्यात आलं असून एक रहिवाशी पुलवामाचा आहे. या कारची मालकी वेगवेगळ्या मालकांकडे आढळल्याने भुवया उंचावल्या आहेत.
हल्लेखोरांनी यावेळी एक वेगळ्या पद्धतीच प्लानिंग केलं होतं. तपास यंत्रणांना चक्रावून सोडणं हा त्यामागे उद्देश होता. i20 कारमध्ये स्फोट झाल्यानंतर तिथे खड्डे पडले नाहीत, बॉम्बस्फोटानंतर उडणारे तीक्ष्ण, टोकदार तुकडे आढळले नाहीत. फॉरेन्सिक एक्सपर्ट, दहशतवाद विरोधी एक्सपर्ट्सनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.स्फोटकांमध्ये वापरलेल्या उच्च ज्वलनशील रसायनामुळे जास्त जिवीतहानी झाल्याची शक्यता आहे. ही उच्च क्षमतेची स्फोटकं होती अशी माहिती समोर आली.

दरम्यान या स्फोटाच्या सखोल विश्लेषणानंतरच बॉम्बस्फोट घडवण्याची थिअरी समोर येईल. फरीदाबादमधूनही काही गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याशी दिल्ली स्फोटाचा काही संबंध आहे का? हे सुद्धा तपासलं जात आहे.