ब्रेकिंग! डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाने सुनावली…..


पुणे : साताऱ्याच्या फलटण येथील वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.या आत्महत्या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी संपदा यांनी हातावर एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे होती. या दोघांना न्यायालयाने आता मोठा दणका देत पोलीस कोठडी सुनावली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर हातावर एक सुसाईट नोट लिहिली. या नोटमध्ये तिने दोन लोकांची नावे लिहिली. पीएसआय गोपाळ बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. प्रशांत बनकर याने मला मानसिक त्रास दिला. प्रशांत बनकर याच्या घरी संपदा मुंडे या किरायाने राहत. मात्र, किरायाची खोली असतानाही फलटणच्या एका हॉटेलमध्ये जाऊन संपदा मुंडेने आत्महत्या केली. दोन दिवसांसाठी तिने हे हॉटेल बुक केले होते. संपदा मुंडे प्रकरणात विविध खुलासे होताना दिसली. आरोपी पीएसआय संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर फरार होता.अखेर त्याने फलटण पोलिस ठाण्यात दाखल होत आत्मसर्मपण केले.आरोपी हा स्वत: पीएसआय असल्याने त्याला तपास नेमका कसा केला जाणार याची पूर्ण माहिती असल्याने तो तपासात अजिबात सहकार्य करत नव्हता. शेवटी आता या प्रकरणात न्यायालयीन कोठडीनंतर आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.त्यासोबत दुसरा आरोपी प्रशांत बनकर याच्याही समस्यांमध्ये वाढ झाली.

या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे. कळंबा कारागृहातून SIT ने ताब्यात घेत फलटण न्यायालयात दोघांनाही हजर केले होते. SIT कडून अधिक तपासासाठी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.. आता SIT कडून या प्रकरणातील आरोपींची चाैकशी केली जाणार आहे. या चौकशीत आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!