ब्रेकिंग! मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोणकोण?


पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुढंवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर, आता राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विकास खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना ‘क्लीन चिट’ मिळाली आहे.त्या 100 पानांच्या अहवालात पार्थ पवार यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.

या मुंढवा येथील जमिनीच्या व्यवहाराची चौकशी पूर्ण करून खरेदी समितीला 6 डिसेंबर पर्यंत अहवाल देण्यास सांगितले होते.त्यानंतर या समितीला मुदतवाड 6 जानेवारीपर्यंत देण्यात आली होती त्यानंतर महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला तपास पूर्ण केला आहे. या तपासात पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान याआधी समितीने पार्टनरशिपमध्ये असलेले दिग्विजय पाटील यांच्याबरोबरच जमिनीचा व्यवहार करणाऱ्या शितल तेजवानी यांच्यावरही ठपका ठेवत तिला दोषी ठरवले होते. त्याचबरोबर अमेडिया कंपनीकडून 21 कोटी वसूल करण्याची शिफारस ही समितीने केली. चौकशी समिती समोर आमेडिया कंपनी आणि तेजवानी यांच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली. मात्र चौकशी अहवालात पार्थ पवार यांचं नाव नसल्याचे समोर आलं.

कागदपत्रावर कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांची सही असल्याने त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.तसेच जमिनीचा व्यवहार करणाऱ्या शितल तेजवानीवरही ठपका ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान समितीने सादर केलेला अहवाल पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार आहे.

अमेडिया कंपनी ही ‘एलएलपी’ कायद्यांतर्गत नोंदणीकृत असल्याने, स्वाक्षरी नसली तरी कंपनीचे अन्य सक्रिय भागीदार तांत्रिकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!