Breaking News : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, उडाली खळबळ..

Breaking News : नागपूरच्या पांचगाव येथे एका भाजप पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
राजू डेंगरे यांची रात्री तीन वाजण्याच्या सुमारस हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांची हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली आहे. लोकप्रतिनिधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. Breaking News
डेंगरें यांचा धाबा आहे, या धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हा हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धाब्यावरील पैसे घेऊन पळून जात असताना या आरोपींच्या कारला पुढे अपघात झाला.
मात्र आरोपी अद्यापही फरार आहेत. भाजप पदाधिकारी राजू डोंगरे यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली आहे. यामुळे नागपूरात शहरात खळबळ उडाली आहे.