Breaking News : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी अखेर अजित पवार यांची निवड, १२ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची नावे जाहीर..


Breaking News मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-

पुणे- अजित पवार, अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील, सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील, अमरावती- चंद्रकांत दादा पाटील, भंडारा- डॉ.विजयकुमार गावित बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर- हसन मुश्रीफ, गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम, बीड- धनंजय मुंडे, परभणी- संजय बनसोडे, नंदुरबार- अनिल पाटील, वर्धा – सुधीर मुनगंटीवार. Breaking News

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाल्यानंतर सरकारमध्ये पालकमंत्रिपदावरून काहीसा वाद उद्भवला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. Breaking News

ही यादी निश्चित करण्यात आल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सायंकाळी दिल्लीस गेले. याच दिल्लीभेटीत पालकमंत्रिपदाविषयीचा तोडगा निघाल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!