Breaking News : हिरो ग्रुपच्या चेअरमन पवन मुंजाल यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, २५ कोटींची संपत्ती जप्त..
Breaking News : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी हीरो मोटोकॉर्प लिमिटेडचे सीएमडी आणि अध्यक्ष पवनकांत मुंजाल यांच्या दिल्लीतील 3 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. एक्स (ट्विटर) वर माहिती देताना ईडीने सांगितले की, या मालमत्तांची किंमत २४.९५ कोटी रुपये आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. Breaking News
ईडीने मुंजाल आणि त्यांच्या कंपन्यांविरुद्ध सीमा शुल्क कायदा, १९६२ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ५४ कोटी रुपयांचे विदेशी चलन अथवा पैसा भारताबाहेर बेकायदेशीरपणे नेल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात होता.
आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाने त्यांची ५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पवन मुंजाळ यांनी बेकायदेशीरपणे ५४ कोटी रुपये देशाबाहेर नेल्याचा आरोप आहे, त्यानंतर डीआरआय आणि ईडीने ही कारवाई केली आहे.
यापूर्वी १ ऑगस्ट २०२३ रोजी एजन्सीने दिल्ली आणि गुरुग्राममधील मुंजाळ यांच्या १२ ठिकाणांवर छापे टाकले होते, ज्यामध्ये २५ कोटी रुपयांचे विदेशी चलन, सोने आणि दागिने जप्त करण्यात आले होते. Breaking News
डीआरआयने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे एजन्सीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याअंतर्गत छापा टाकण्यात आला होता. डीआरआयने पवन मुंजाळ, अमित बाली, हेमंत दहिया आणि केआर रमण यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
पवनकांत मुंजाल यांनी इतर व्यक्तींच्या नावे विदेशी चलन जारी केलं आणि नंतर परदेशात वैयक्तिक खर्चासाठी त्याचा वापर केला, असं ईडीच्या तपासात उघड झालं आहे.