Breaking News : संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत विरोधकांचा गोंधळ, काँग्रेसचे पाच खासदार निलंबित..


Breaking News : संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याच्या प्रकरणावरुन लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळं काँग्रेसच्या पाच खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करताना सभागृहात असभ्य वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

काल बुधवारी (ता.१३) दाेन तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली. या घटनेचे तीव्र पडसाद आज (ता.१४) संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहांमध्‍ये उमटले. लोकसभा आणि राज्‍यसभेत विरोधी पक्षांच्‍या सदस्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

तसेच संसद सुरक्षाभंग प्रकरणावरून संसदेत गदारोळ घातल्याने काँग्रेसच्या १४ लोकसभा खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल काँग्रेस खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. Breaking News

संसद सुरक्षा भंग झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे कामकाज सुरू होताच गदारोळ सुरू झाला. विरोधी पक्षाच्या काँग्रस खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत, सभागृहात गदारोळ घातला. “अनियमित वर्तन” केल्याबद्दल काँग्रेसच्या पाच खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, टीएन प्रथापन, हीबी एडेन, एस जोथीमनी, राम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस या पाच खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर लगेचच विरोधकांनी सभागृहात कालच्या संसदेच्या सुरक्षेत झालेल्या गंभीर चुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला टार्गेट करत गोंधळ घालायला सुरुवात केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!